
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत मोठं यश हाती लागलं आहे. येथील एका घरात लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातलं आहे. सध्या या भागात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्राल भागात सोमवारी रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा देऊन नाकाबंदी केली. या चकमकीत अखेर सुरक्षा दलाला यश आलं आणि दोन दहशतवादी यमसदनी धाडण्यात आले.
Jammu & Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Tral. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/e8lu8WCivb
— ANI (@ANI) March 5, 2019
याआधी रविवारीही कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात आले. तब्बल तीन दिवस ही चकमक सुरू होती. पण, दुर्दैवाने या चकमकीत हिंदुस्थानचे पाच जवान शहीद झाले.
























































