कुर्ल्यात कुख्यात गुंडावर गोळीबार, परिसरात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत कुर्ला येथील हलाव पुलाजवळ एका कुख्यात गुंडावर गोळीबार करण्यात आला आहे. जानू पवार उर्फ बिल्ला असे या गुंडाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला सायन येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर कुर्ला, विनोबा भावे नगर पोलीस ठाणे तसेच इतर ठिकाणी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल  आहेत. नुकताच तो एका खून प्रकरणात जामिनावर सुटला होता. कुर्ला पोलिसांनी गोळीबारप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान गोळीबारामुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.