
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या अडीच वर्षात हिंदुस्थानमध्ये बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. फेब्रुवारी महिन्यात 7.2 टक्क्यांवर बेरोजगारी पोहोचली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण 5.9 टक्के होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने ही आकडेवारी जारी केली आहे.
रॉयटर्सच्या एका अहवलानुसार 2016 ते 2019 फेब्रुवारी या मोदी सरकारच्या काळात बेरोजागारीने उच्चांक गाठला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आलेली आकडेवारी मोदी सरकारला डोकेदुखी ठरू शकतात. CMIE ने दिलेली आकडेवारी ही सरकारने दिलेल्या आकडेवारीहून अधिक विश्वासार्ह असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. देशातून हजारो कुटुबींयांचे केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी तयार केली जाते.

























































