
सामना प्रतिनिधी, निलंगा
निलंगा तालुक्यातील हलगरा गावातील अल्पवयीन मुलीवर एका अपंग व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
हलगरा येथील अल्पवयीन मुलीस व्यंकट झटिंग रोळे याने चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावून घेतले आणि त्या दरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून औराद पोलीस ठाण्यात कलम ३७६ अ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकट रोळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी पुढील चौकशी साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर करीत आहेत.


























































