सामना ऑनलाईन । कोल्हापूर
‘मी अंबाबाईच्या विराट दर्शनाला नतमस्तक होऊन एवढंच मागेन की आम्ही जे काही करतोय ते इमाने इतबारे करतो आहे आणि तुमचा आशीर्वाद हेच आमचं भांडवल आहे आणि तुमच्या या भांडवलाला व तुमच्या विश्वासाला आयुष्यात कधी तडा जाऊ देणार नाही एवढंच वचन मी शिवरायांच्या साक्षीने तुम्हाला देतो’, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात आयोजित महायुतीच्या अतिविराट सभेत उपस्थित जनसमुदायाला दिले.
- महायुतीची पहिली सभा संपन्न
- पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण संपन्न
-
- जनतेंचे आशिर्वाद हे आमचे भांडवल
- लोकसभा आणि विधानसभेवर भगवा फडकणारच
-

- देवेंद्रजी तुम्ही शब्द दिला आणि पाळला, तुमचा मला अभिमान वाटतो
- राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर अजित पवार धरणं कशी भरतात हे आठवा
- सत्ता आल्यावर राम मंदिर होणार याबाबत खात्री
- आम्हाला सत्ता हवी गोर गरीबांसाठी, मजबूत देशासाठी – उद्धव ठाकरे
- आई जगदंबेच्या आशिर्वादाने शिवकार्य सुरु केले आहे.
- कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला

- देवेंद्रजी पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, त्यांची जागा जनतेने दाखवली आहे.
- होय, आमची इव्हेंट मॅनेजमेंट, विजयाची घौडदोड करणारी इव्हेंट मॅनेजमेंट
- माथाडी कामगाराला खासदार बनवून दिल्लीला पाठवायचंय
- शिवरायांनी सामान्य माणसाला असामान्यत्व दिले.
- सगळे रंग एका बाजूला आणि आपला भगवा एका बाजूला
- आता राजकीय धुळवडीला सुरूवात
- अंबाबाई आणि शिवरायांच्या मावळ्यांसमोर नतमस्तक
- पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
- मोदींना मजबूत सरकार द्यायचे आहे.
- आज सगळे जग आमच्या सोबत
- ये नया हिंदुस्थान है, घरमे घुसेगा भी और ठोकेगा भी
- २६/११ झाल्यावर सरकारने फक्त निषेध केला.
- महाराजांची सेना ही देव, देश आणि धर्मासाठी लढते
- आमचे सैन्य छत्रपतींच्या सैन्यासारखे
- हातकंणगलेत युवा चेहरा दिला आहे.
- आमची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तुमची(आघाडीची) भ्रष्टाचार कंपनी
- सुर्यावर थुंकल्यास आपल्याच चेहर्यावर थुंकी उडते.
- शेतकरी, सामान्य माणसांच्या मागे समर्थपणे आमचे सरकार उभे
- आजपर्यंत जे कोणीही केले नाही ते मोदींनी केले.
- आघाडीमुळे सामान्य माणूस सामान्यच राहिला.
- पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच्या तुलनेत युतीने जास्त विकास केला.
- आघाडीच्या १५ वर्षांच्या कालावधीपेक्षा युतीने गेल्या साडेचार वर्षात जास्त काम केले.
- पंतप्राधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घर मिळाले.
- उज्वलाच्या माध्यमातून गरीबांच्या घरी गॅस मिळाला
- गरीबी हटाओचे नारे देऊन काँग्रेस नेत्यांची गरीबी हटली.
- महाराष्ट्रात आणि युती आणि देशात एनडीचे सरकार येणार
- कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली.
- केवळ नावात राष्ट्रवादी म्हटल्याने राष्ट्रवादी होत नाही.
- देश चालवायला ५६ पक्ष नाही लागत ५६ इंचाची छाती लागते.
- आघाडीचं काय चाल्लंय तेच कळत नाही.
- चंद्रपूर पासून कोल्हापूरपासून भगवा फडकावा हे आई जगदंबेकडे मागणं
- कोल्हापूर हे आमचे शक्तिपीठ
- मुंबईत अरबी सागर आणि कोल्हापुरात महासागर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरूवात
- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या प्रचाराचा नारळ फोडला
- पुन्हा राज्यसभेवर निवडून येईन
- महायुतीची पाहून गर्दी, आघाडीला होईल सर्दी
- राहुल गांधींनी पंतप्रधान बनण्यासाठी भानगडी करू नये, आम्ही भानगडी करण्यात हुषार
- काँग्रेसका सपना, सपनाने तोडला- रामदास आठवले.
- आंबेडकरांच्या स्मारकांसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला.
- तुम्ही तुमचे वाद मिटवले आणि तुमच्यासोबत आले आठवले- रामदास आठवले.
- संविधान वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले.रामदास आठवले.
- केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या भाषणाला सुरूवात
- आघाडीमध्ये भिती निर्माण झाली आहे.
- कोल्हापूरच्या दोन्ही जागा जिंकल्यात जमा
- ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची – चंद्रकांतदादा पाटील
- महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणाला सुरूवात
- पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री पर्रिकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
- कोल्हापूरच्या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, सदाभाऊंनी व्यक्त केला निर्धार
- सदाभाऊ खोत यांच्या भाषणाला सुरूवात
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवनच्या भव्य मैदानावर लाखो शिवसैनिक, भाजप आणि रिपाइंचे कार्यकर्ते, नागरिकांच्या साक्षीने प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
Photo : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
पाहा सर्व लाईव्ह अपडेट –
- सभास्थळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन
- थोड्याच वेळात सुरू होणार महायुतीची झंझावती सभा
- सभास्थळी शिवसैनिक, भाजप आणि महायुतीचे कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
- शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित तसेच शिवसेना नेते, पदाधिकारी, मंत्री उपस्थित
- उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
- ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशी गगणभेदी घोषणाबाजी
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
- तपोवनच्या भव्य मैदानावर होणार सभा

- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालून महायुतीच्या महासभेच्या झंझावाताची सुरुवात होणार
- महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार
- शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची कोल्हापुरात सभा































































