
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयामध्ये दहशत निर्माण करुन तसेच कायदा हातात घेवून गुन्हे करणारा कुप्रसिध्द गुंड रुपेश दयानंद कोत्रे रा. लांजा शेवरवाडी, ता.लांजा जि.रत्नागिरी यास मुंबई पोलीस कायदा कलम 56(1) प्रमाणे रत्नागिरी जिल्हयातून 2 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश राजापूर उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.
रुपेश दयानंद कोत्रे याचे विरुध्द लांजा पोलीस स्टेशन या ठिकाणी सन 2008 पासून खुन, बलात्कार, विनयभंग, मारामारी, चोरी, सरकारी नोकारास मारहाण वगैरे यासारखे एकुण 11 दखलपात्र गुन्हे व 14 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 गुन्हयांमध्ये त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे.































































