Lok sabha 2019 राजदमध्ये फूट, तेजप्रताप यादवचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना बिहारमधील प्रमुख पक्ष राष्ट्रीय जनता दलमधील अंतर्गत संघर्ष वाढला आहे. लालू प्रसाद यादव यांचा छोटा मुलगा तेजप्रताप यादव याने बंडाचे निशाण फडकावत राजदच्या विद्यार्थी विंगचा राजीनामा दिला आहे. तेजप्रतापने ट्विटरवरून याची घोषणा केली.

महाआघाडीच्या जागावाटपाच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या तेजप्रतापने बंड करत राजदच्या विद्यार्थी विंगचा राजीनामा दिला. ट्विटरवर, ‘मी राष्ट्रीय जनता दलाच्या संरक्षक पदाचा राजीनामा देत आहे. मला नादान समजणारे लोक नादान आहेत. कोण किती पाण्यामध्ये आहे याची मला सर्व माहिती आहे’, असे ट्वीट तेजप्रतापने केले आहे.

याआधी तेजप्रताप एक पत्रकार परिषद घेणार होते, परंतु ऐनवेळीस ती रद्द करण्यात आली. या दरम्यान, बंडाचे निशाणा फडकावलेल्या तेजप्रताप यांनी शिवहर आणि जहानाबाद येथून आपल्या उमेदवारांची घोषणा केली. शिवहर येथून अंगेश कुमार तर जहानाबात येथून चंद्र प्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात राजदमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा भाजप आणि आघाडीला होऊ शकतो.