मिशन शक्तीप्रकरणी पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाची क्लिन चीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election-commission-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मिशन शक्ती यशस्वीरित्या पार पडल्याने पंतप्रधान मोदींनी २७ मार्च रोजी देशाला उद्देशून एक भाषण केले होते. परंतु या भाषणामुळे आचार संहितेचे उल्लंघन झाले अशी तक्रार विरोधी पक्षांनी केली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना क्लीन चीट दिली असून यात आचार संहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे म्हटले आहे.

२७ मार्च हा दिवस आपल्यासाठी विशेष असल्याचे मोदींनी म्हटले होते. तसेच या दिवशी हिंदुस्थानचा त्या चार देशांमध्ये समावेश झाला आहे ज्यांच्याकडे अंतराळात शत्रूचे सॅटेलाईट उध्वस्त करण्याची ताकद आहे. या मिशनमुळे हिंदुस्थान अंतराळातही मजबूत झाल्याचे मोदींनी म्हटले होते.

या भाषणावर विरोधी पक्षांनी मोदींवर टीका केली. राहुल गांधींनी मोदींवर टीका करत जागतिक रंगभुमी दिनाच्य शुभेच्छा दिल्या होत्या. काँग्रेसने डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली तसेच मोदी या कामाचे इव्हेंट करत असून त्यावर आपली राजकीय पोळी भाजत असल्याची टीका काँग्रेसने केली होती.