
सामना ऑनलाईन । मैनपुरी
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशच्या मैनपुरी मतदारसंघातून आपला लोकसभेसाठीचा अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात मुलायम यांनी आपला सहकारी पक्ष बहुजन समाज पक्षाचे नाव घेणेही टाळले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात सपाला सर्वात जास्त जागा मिळतील. बसपाच्या यशावर मात्र त्यांनी मौन बाळगले.
यूपीत सपा-बसपा आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे संकेत नेताजी मुलायमसिंह यांनी आपल्या मौनातून दिल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. मुलायम यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे महासचिव रामगोपाल यादव आणि त्यांचे पुत्र अक्षय यादव उपस्थित होते.

























































