
सामना ऑनलाईन, मुंबई
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘काँग्रेसने मला धोका दिला’ असं म्हणणारे सत्तार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर बोलताना सत्तार म्हणाले की काँग्रेसने मला धोका दिला,कुठेतरी आधार घ्यावा लागतो यासाठीच मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो. या भेटीमुळे आणि सत्तारांच्या विधानामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आणखीनच जोरात सुरू झाली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर मुलाखत घेतली. यावेळी त्यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सावधपणे उत्तर देताना सत्तार म्हणाले की मी भाजपमध्ये जाणार नाहीये मात्र मित्र म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील देण्यास सत्तार यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांशी काय बोलणे झाले हे मी माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलेन आणि त्यांतर पुढची रणनिती ठरवली जाईल असं सत्तार म्हणाले. मी अपक्ष म्हणून





























































