नीरव मोदी देश सोडून पळाला, तेव्हा चौकीदार झोपले होते काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

 पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेतात. मग जनतेचे 14 हजार कोटी रुपये बुडवणारा हिरे व्यापारी नीरव मोदी देश सोडून लंडनला पळाला तेव्हा हे चौकीदार झोपले होते काय, असा सवाल बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना केला.

केंद्रातले मोदी सरकार फेकू सरकार आहे. गुगलवर फेकू शब्द टाकला तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ही देशाची निवडणूक आहे, कुटुंबाची नव्हे, याचे भान पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करताना ठेवायला हवे होते, असेही विद्यमान खासदार सुप्रिया पुढे म्हणाल्या.