
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे, तर मराठमोळी सृष्टी जयंत देशमुख देशात पाचवी आली आहे. टॉप 50मध्ये महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी आहेत. यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यशाची गुढी उभारली आहे.
यूपीएससीची मुख्य परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2018मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी-मार्चमध्ये झाल्या होत्या. आज निकाल जाहीर झाला. त्यात आयएएस, आयएफएस, आयपीएस, ग्रुप-ए, ग्रुप-बीसाठी देशभरातून 812 उमेदवारांची निवड केली. त्यात खुल्या प्रवर्गातून 414, इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओबीसी) 209, अनुसूचित जाती (एससी) 128, अनुसूचित जमाती (एसटी) 61 यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील यशवंत आणि त्यांचा रँक
पूज्य प्रियदर्शनी (11), तृप्ती अंकुश धोडमिसे (16), वैभव सुनील गोंदणे (25), काजल जावळे (28), मनीषा माणिकराव अवाळे (33), हेमंत केशव पाटील (39), स्नेहल नाना धायगुडे (108), सौम्या रंजन राऊत (118), दिग्विजय संजय पाटील (134), आदित्य धनंजय मिरखेलकर (155), नचिकेत विश्वनाथ शेळके (167), अमित मारुतीराव काळे (212), योगेश अशोकराव पाटील (231), अभिषेक सराफ (248), सागर विजय काळे (254), नवजीवन विजय पवार (316), नेहा दिवाकर देसाई (332), ऋजुता दिनेश बनकर (325), स्नेहा सूर्यकांत गिते (331), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (361), गोकूळ महाजन (373), प्रतीक खामतकर (377), वैभव दासू वाघमारे (401), शुभम ज्ञानदेवराव ठाकरे (412), गायत्री देवीदास हायलिंगे (437), सचिन प्रकाश पवार (444), अर्चना पंढरीनाथ वानखेडे (447), रणजित हरिश्चंद्र थिपे (480), ऋषीकेश प्रदीप रावळे (491), निकेतन बन्सीलाल कदम (501), नीलेश महादेव कुंभार (503), चंद्रशेखर घोडके (514), विक्रम ज्ञानदेव फडके (530), राजीव रमेश मेश्राम (542), महादेव विठ्ठलराव गिते (567), परमानंद प्रवीण दराडे (616), किरण गंगाराम चव्हाण (618), गणेश महादेव टेंगळे (631), अरविंद राजाभाऊ रेंगे (633), मच्छिंद्र उत्तम गाळवे (640), अमोलसिंह अंकुशराव भोसले (672), सुबोध रमेश मानकर (673), आकाश संतोष कोळी (677), विशाल बाबूराव देवकी (684), समीर विजय महाजन (688), शुभम प्रकाश नगराळे (693), श्वेता शंकरराव निवडंगे (710), तेजस रमाकांत माहिरे (721)
क्लास न लावता नचिकेत शेळके यांनी मिळवले यश
नचिकेत विश्वनाथ शेळके यांनी यूपीएससीत 167वा रँक मिळवला आहे. मुळचे पुणे जिल्हय़ातील शिरूर तालुक्यामधील शिक्रापूरजवळ पिंपळे खालच या गावचे ते आहेत. आई-वडील दोघेही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असून क्लास न लावता नचिकेतने हे यश मिळवले आहे.



























































