
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रिया गडा, साहिल शेख व तन्मय कोचरेकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना स्पेशल वर्ल्ड समर गेम्समध्ये पदकांची लयलूट केली.
प्रिया गडाने रोलर स्केटिंगमधील 100 मीटरमध्ये सुवर्ण, 500 मीटरमध्ये रौप्य, 2 बाय 100 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक पटकावले. साहिल शेखने 100 मीटरमध्ये सुवर्ण व 1000 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले. तन्मय कोचरेकरने बास्केटबॉलमध्ये रौप्य पदक पटकावले. विठ्ठल राठोड, आकाश एकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली हे विशेष.




























































