देशातील ईव्हीएम मशीन 100 टक्के सुरक्षित नाहीत; सॅम पित्रोदा यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।  नवी दिल्ली

देशातील ईव्हीएम मशीन 100 टक्के सुरक्षित नाहीत, असे स्पष्ट मत संगणकतज्ञ व काँग्रेसच्या विदेशस्थित हिंदुस्थानी नागरिकविषयक मंचाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालापात ते बोलत होते. मी या ईव्हीएम मशीनचा अभ्यास केला. त्यात ही मशीन विश्वासार्ह नाहीत, असे लक्षात आले. ही यंत्र व त्यांची डिझाईन 15 वर्षांपूर्वी तयार केली आहेत. त्यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक करणे व प्रत्यक्ष मतमोजणी या दोन्ही पातळय़ांवर गडबड होऊ शकते. ती केव्हा व किती होईल हे मी सांगू शकत नाही, असे ते म्हणाले.