अमेरिकेच्या ‘एच 1 बी’ व्हिसासाठी 65 हजार अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्यूयॉर्क

अमेरिकेच्या ‘एच 1 बी’ व्हिसासाठी 65 हजार अर्ज आल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे. 2020 या वर्षांसाठी हे अर्ज असून हिंदुस्थानी व्यावसायिकांसह इतर देशांतील इच्छुकांचे हे अर्ज आहेत. ‘एच 1 बी’ मार्फत देशात येणार्‍या कुशल कर्मचार्‍यांवर अमेरिकेतील आयटी कंपन्या अवलंबून आहेत. यामध्ये हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांतील कर्मचार्‍यांचा अधिक समावेश आहे. एच 1 बी व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे परदेशी लोकांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते. अमेरिकी नागरिकत्व क स्थलांतर सेवेने म्हटले आहे की, एच 1बी व्हिसासाठी 65 हजारांची अर्ज मर्यादा असली तरी 2020 या आर्थिक वर्षांसाठी पुरेसे अर्ज आलेले आहेत. हे वर्ष 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरू होणार आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर विभागाने 1 एप्रिलपासून अर्ज मागवले होते.