लेख : प्लॅस्टिक कचरामुक्त हिंदुस्थानच्या दिशेने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विनोद शुक्ला<<

पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला प्लॅस्टिक आयात बंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरीही अजूनही पीईटी आणि अन्य प्लॅस्टिक भंगार आयात करण्याची परवानगी कायम आहे. यामुळे प्लॅस्टिक कचरा आपल्या देशातून नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रगतीत अडथळे येत आहेत. उद्योग क्षेत्र, पर्यावरणवादी आणि विशेषकरून कचरा वेचणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या हिंदुस्थानात दररोज 25,940 टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो आणि त्यातील जवळपास 40 टक्के कचरा गोळा केला जात नाही. 

हिंदुस्थानी कंपन्या या अन्य देशांकडून प्लॅस्टिक भंगार आणि रद्दी आयात करत आहेत आणि जमिनीवर तसेच समुद्रामध्ये दररोज तयार होणारा टनावारी प्लॅस्टिक कचरा मात्र कोणत्याही प्रकियेशिवाय तसाच पडून आहे. याचे कारण म्हणजे आपल्या देशात निर्माण होणारा प्लॅस्टिक कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आणि अशा प्रकारे एकाच वेळी प्लॅस्टिक समस्येचे निराकरण करणे यासाठी जी यंत्रणा राबवावी लागणार आहे त्यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा चारपट कमी किंमतीत प्लॅस्टिक कचरा आयात करता येतो.

2016-17 या आर्थिक वर्षातील 12 हजार टन प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रमाणात चारपट वाढ होऊन 2017-18 या आर्थिक वर्षात हे प्रमाण 48 हजार टन झाले. याचाच अर्थ या प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये 290 टक्क्यांनी वाढ झाली. पं. दीनदयाळ उपाध्याय स्मृती मंचाचे (पीडीयूएसएम) या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या मोहिमेनंतर पर्यावरण मंत्रालयाकडून प्लॅस्टिक कचरा आयातीवर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे.

उद्योग क्षेत्र, पर्यावरणवादी आणि विशेषकरून कचरा वेचणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या हिंदुस्थानात दररोज 25,940 टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो आणि त्यातील जवळपास 40 टक्के कचरा गोळा केला जात नाही.

सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक उद्योगांना कचरा वेचकांच्या मदतीने प्लॅस्टिक कचरा संकलन यंत्रणा मजबूत करणे भाग पडेल. हिंदुस्थानात चार दशलक्ष कचरा वेचकांची फौज आहे. त्या सर्वांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने देशातील सर्व प्लॅस्टिक कचरा नष्ट करता येऊ शकतो. आजमितीला, हिंदुस्थानात 80 टक्के पीईटी (प्लॅस्टिक) बाटल्यांवर (पाणी, कोला आणि ज्यूस) पुनर्वापर प्रक्रिया केली जाते. अमेरिका, युरोपियन युनियन आणि जपान यासारख्या विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे आणि याचे सारे श्रेय हे या ‘कचरा वेचक समुदाया’चे आहे.

पीईटी बाटल्या गोळा करणे हा या चिंधी वेचक समुदायासाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. कारण पुनर्वापर प्रक्रियेमध्ये या बाटल्यांना सर्वात जास्त मागणी आहे. रोजगार सुरक्षा, वेतन आणि प्रतिष्ठा नसणाऱ्या या कामात आज हिंदुस्थानातील कचरा वेचक हे काम करत आहेत. इतकेच नव्हे तर गरिबी, रस्त्यावरील अपमान, छळवणूक आणि लैंगिक अत्याचार याव्यतिरिक्त काचेचे तुकडे, संसर्ग आणि श्वासाचे आजार यांचा त्यांना सातत्याने सामना करावा लागतो. कचरा गोळा करून, त्याचे वर्गीकरण करून आणि मग ते क्रॅप विक्रेते/पुनर्वापर करणाऱ्यांना विकून हे कचरा वेचक स्वतःची गुजराण करतात. स्थानिक नगरपालिका संस्थांच्या सोबतीने कचरा वेचकांना कचरा संकलन एकात्मिक तंत्राचा महत्त्वाचा भाग बनवून तिथल्या तिथे कचऱ्याचे वर्गीकरण करून एक एकात्मिक तंत्र स्थापन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

कचरा गोळा करत असताना पर्यावरण संरक्षण सेवेच्या बदल्यात जर त्यांची नावनोंदणी केल्यास त्यांना आरोग्य लाभ, सुरक्षा कवच, सामाजिक सुरक्षा आणि प्रतिष्ठत आयुष्य जगण्याची संधी मिळेल.

हिंदुस्थानात सर्वत्र या संस्थेच्या शाखा असून स्थानिक सरकारी संस्था, कार्यकर्ते, कॉर्पोरेट्स, वैज्ञानिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यातून ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त हिंदुस्थान’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. आमची संस्था ही विकासाला आणि समाजातील समानतेला पाठिंबा देणारी संस्था आहे. माझे दिवंगत ताऊजी आणि प्रेरणास्थान असणाऱ्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही झटत आहोत. अंत्योदय आणि अभिन्न मानवतावाद या विचारसरणीनुसार त्यांनी आपले जीवन व्यतित केले. जिथे मानव केंद्रस्थानी असेल अशा स्वदेशी विकासाचा नमुना विकसित करणे असा याचा अर्थ आहे. आपल्या समाजातील कचरा वेचकांसारख्या दुर्लक्षित समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आमची संस्था कार्य करत आहे. यामुळे आपल्या देशाच्या उज्ज्वल आणि हिरवाईने नटलेल्या भविष्यकाळाला वास्तवात आणण्यासाठी त्यांना त्यांचे योगदान देता येईल आणि पर्यायाने प्रतिष्ठत आयुष्य जगता येईल.

पीडीयूएसएमचे राष्ट्रीय सरचिटणीस आनंद मणी म्हणतात, आपल्या देशातील बाह्य आणि अंतर्गत (वैचारिक) प्रदूषण दूर करणे हे आमचे ध्येय आहे. पहिले उद्दिष्ट साध्य करता यावे यासाठी आम्ही पर्यावरण मंत्रालयाच्या सहकार्याने आपल्या देशातील प्लॅस्टिक कचरा नष्ट करण्याकरिता काम करत आहोत. दुसरे म्हणजे, आमचे अध्यक्ष हे आनंद मूर्तीचे शिष्य आहेत आणि गेल्या 53 वर्षांपासून ते अष्टांग योग साधना करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट्ससाठी ध्यान आणि योग शिबिरांचे आयोजन करतो. 28 फेब्रुवारी रोजी पर्यावरण मंत्री हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या ‘प्लॅस्टिक वेस्ट फ्री इंडिया’ या विचारशील आणि लयबद्ध गाण्याचा रॅप सिक्वेन्स नुकताच संस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. सात भाषांमध्ये रचलेले हे गाणे त्यांच्या पीडीयूएसएस (PDUSS) यूटय़ुब चॅनेलवर उपलब्ध आहे.

पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला प्लॅस्टिक आयात बंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरीही अजूनही पीईटी आणि अन्य प्लॅस्टिक भंगार आयात करण्याची परवानगी कायम आहे. यामुळे  प्लॅस्टिक कचरा आपल्या देशातून नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रगतीत अडथळे येत आहेत. पूर्वीप्रमाणेच याही वेळी पीडीयुएसएमच्या संशोधन चमूने आयात केले जाणारे आणि तातडीने प्रतिबंधित करणे आवश्यक असणारे प्लॅस्टिक भंगाराचे एचएस कोड्स शोधून काढले आहेत. हे एचएस कोड्स आहेत – 39076920, 39076990, 39079990 आणि 39159042. यामध्ये पीईटी, एचडीपीई आणि अन्य प्रकारच्या मोठय़ा प्रमाणात पुनर्वापर होणाऱ्या प्लॅस्टिकचा समावेश आहे. हे प्लॅस्टिक स्थानिक पातळीवर निर्माण होत असून त्याचा पुनर्वापर केला जात नाही.

कचऱ्यातून अर्थनिर्मिती 

सध्याच्या जागतिक कचरा पुनर्वापर बाजाराचे मूल्य 282 अब्ज डॉलर्स इतके असून प्लॅस्टिक पुनर्वापरातून निर्माण होणारा महसूल हा 2018 मध्ये अंदाजे 37.6 अब्ज डॉलर्स इतका होता. पीडीयुएसएमचे अध्यक्ष म्हणतात, कचरा वेचक समुदायाचे पाठबळ असल्याने पुनर्वापर उद्योगाकडे आपल्या देशात लाखो नवे रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. स्थानिक पातळीवर निर्माण झालेला कचरा स्रोतांचा वापर करून गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर पुनर्वापर उद्योग मजबूत व्हायला मदत होईल आणि ही सर्वाच्याच हिताची बाब होईल. रस्त्यावरील प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, कचरा वेचकांना चांगले वेतन मिळेल आणि स्थानिक पुनर्वापर उद्योगांना प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा माल उपलब्ध होईल.

(लेखक पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती मंचाचे अध्यक्ष आहेत.)