पवारांना कळाले मोदींची हवा, म्हणूनच निवडणुकीतून माघार; राजनाथ सिंह यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलईन । चंद्रपूर

शरद पवार हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांना कळाले आहे. हवा कुठे चालली आहे. सध्या मोदींची हवा आहे. पराभव निश्चित असल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असा टोला केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर यांच्या सभेत ते बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले की, “योद्धे मुडदे मोजत नाहीत, गिधाडे मोजतात.” बालाकोटवरील हवाई हल्ल्यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या संशयावरून राजनाथसिंह यांनी हा हल्ला चढवला. तसेच, एअर स्ट्राईकवर शंका घेतली जाते. मोदी श्रेय घेतात, असं म्हटलं जातं. मग 1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, तेव्हा त्यांचा जजयकार केला गेला. मग आता मोदींचा जयजयकार का नाही सहन होत? असा सवाली त्यांनी उपस्थित केला.