
सामना ऑनलाईन, अमेठी
गांधी कुटुंबावर सातत्याने घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होत आला आहे. अमेठीमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोड शोमध्ये प्रियंका यांची दोन्ही मुले सहभागी झाली होती.
Congress President @RahulGandhi to file his nomination in Amethi today.#AmethiKaRahulGandhi pic.twitter.com/YY7aLKKbhm
— Congress (@INCIndia) April 10, 2019
यामुळे भाजप समर्थकांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करत प्रियंका यांची मुले देखील काँग्रेसमध्ये येणार काय? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. या रोड शो मध्ये प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया सामील झाले होते.
Few days ago media was saying don’t drag kids into politics
Today Rehan Vadra and his sister miraya Vadra seen on truck with Rahul Gandhi during his nomination rally
This party will always remain in hands of one family.
BJP will always remain hands of people with merit
— चौकीदार अंकित जैन (@indiantweeter) April 10, 2019
राहुल गांधी यांच्या रोड शो मध्ये प्रियंका सहभागी होणारच होत्या त्यांच्याशिवाय त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील सहभागी होणार होते. मात्र रेहान आणि मिराया देखील या रोड शोमध्ये सहभागी झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही हिंदी माध्यमांनी या रोड शो द्वारे प्रियंका यांनी त्यांच्या मुलांचे राजकारणात लाँचिंग केल्याचेही म्हटले आहे.
अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2004 साली त्यांनी इथून पहिल्यांदा विजय मिळवला होता. अमेठी मतदारसंघ हा गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघातून संजय गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही निवडणूक जिंकली आहे.


























































