
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज बीडमध्ये त्यांच्या पक्षाचा मेळावा घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मुंडे भगिनींविरोधात एल्गार करत राष्ट्रवादीला मतदान करून शेतकरी पुत्राला विजयी करा असे आवाहन केले आहे. त्यामुळे महायुतीसोबत असणारे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये मात्र आपली भूमिका वेगळी घेतली आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून शीत युद्ध सुरू आहे. बीड जिल्हापरिषदेत भाजपला दिलेला पाठींबाही त्यांनी काढून घेतला होता. त्यांचे जिल्हापरिषद मध्ये चार सदस्य होते मात्र या चार पैकी तीन जिल्हापरिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी फोडले व त्या सदस्यांनी शिवसंग्रामचा राजीनामा देऊन ते पंकजा मुंडे यांच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे विनायक मेटे प्रचंड चिडले होते. राज्यात महायुती सोबत मात्र बीड मध्ये भाजपला विरोध अशी भूमीका त्यांनी घेतली आहे
























































