Video : बोगस मतदारांना रोखण्यासाठी बीएसएफला करावा लागला गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यात बोगस मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना हवेत गोळीबार करावा लागला. ते बोगस मतदार योग्य ओळख पत्राशिवाय मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात घुसत होते. त्यामुळे त्यांना हुसकावून लावण्य़ासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला.

शामली जिल्ह्यातील कंढला भागात मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरू होते. दरम्यान दुपारी काही सात ते आठ समाजकंटक या केंद्रावर आले मात्र त्या समाजकंटकांकडे योग्य ओळखपत्रे नसल्याने जवानांनी त्यांना मतदान करता येणार नाही असे सांगितले. मात्र त्या समाजकंटकांनी जवानांशी वाद घालत जबरदस्तीने मतदान केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला.