
सामना ऑनलाईन । हिलो
कृष्णविवराचे पहिलेच छायाचित्र घेण्याचा विक्रम संशोधकांनी केल्यानंतर येथील एका भाषा प्राध्यापकाने या कृष्णविवराला ‘पोवेही’ हे नवे नाव दिले आहे. येथील एका साप्ताहिकाने आपल्या ताज्या अंकात म्हटले आहे की, हवाई-हिलो विद्यापीठातील हवाईयन प्राध्यापक लॅरी किमुरा यांनी ब्रह्मांडातील कृष्णविवराचे नामकरण ‘पोवेही’ असे केले आहे. या कृष्णविवराचे पहिलेच छायाचित्र बुधवारीच जगासमोर आले होते. त्यासाठी जगभरात 8 रेडिओऍक्टीव्ह दुर्बिणी बसवण्यात आल्या होत्या.
























































