
सामना ऑनलाईन। हैदराबाद
हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी ‘आधार’ने (यूआयडीएआय) दिलेल्या तक्रारीनंतर आयटी ग्रिड्स (इंडिया) या माहिती तंत्रज्ञान कंपनी विरोधात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 7.8 कोटींहून अधिक लोकांच्या आधार कार्डची माहिती बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या सुमारे 8.4 कोटी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलुगू देसम पक्षाने ‘सेवा मित्र ऍप’ डेव्हलप केले होते. सदर कंपनी आधार कार्डचा हा डेटा त्यासाठी वापरत होती, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तेलुगू देसम पक्षाने या आरोपांचा इन्कार केला आहे.


























































