
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात लवकरच स्वदेशी बनावटीचे ‘निर्भय’ क्षेपणास्त्र सामिल होणार आहे. 1000 किलोमीटरपर्यत अचूक लक्ष्यभेदाची क्षमता असलेल्या या ‘निर्भय’ सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची सोमवारी ओडिशातील समुद्रकिनारी यशस्वी चाचणी करण्यात आली.
Today India’s 1,000 km strike range sub-sonic cruise missile ‘Nirbhay’ was successfully test fired off the coast of Odisha. pic.twitter.com/wDT3YTwNpB
— ANI (@ANI) April 15, 2019
निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे पाकड्यांसह चीनलाही धडकी भरणार आहे. डीआरडीओने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.

























































