जिथे पवार तिथे राज, मग भाषणाची स्क्रीप्ट तयार होते; भाजपचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणूक प्रत्यक्ष लढत नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराची आघाडी उघडली आहे. सोलापूर येथे झालेल्या सभेच्या दिवशी राज यांचा ज्या हॉटेलात मुक्काम होता तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही थांबले होते. यापार्श्वभूमीवर भाजप नेते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जिथे पवार असतील तिथे राज ठाकरे पोहोचतील. मग दोघांमध्ये भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोला लगावला.

राज ठाकरे व शरद पवार हे दोघे हॉटेलमधून बाहेर पडणारे छायाचित्र ‘आमचा महाराष्ट्र’ या ट्विटर हॅण्डलवरून प्रसिद्ध केले आहे. करता आणि करविता एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे. कारण गंगाधर ही शक्तिमान है हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असल्याची टिप्पणी करण्यात आली आहे.