ज्यांना विकासावर मत मागता येत नाही ते जातीयवादावर मत मागताहेत; गडकरींचे पुन्हा टोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nitin-gadkari

सामना ऑनलाईन । पैठण

काँग्रेसला गेल्या पन्नास वर्षांत जे जमले नाही ते भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून गेल्या पाच वर्षांत करून दाखवले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अनेक विकासकामे केली. ज्यांना विकासावर मत मागता येत नाहीत त्यांनी जातीयवादावर मत मागायला सुरुवात केली, अशा शब्दांत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पैठण येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना गडकरी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांवर जोरदार टीका केली. सुरुवातीपासून काँग्रेस गरिबी हटावचा नारा देत आहे. आता पंडित नेहरूंचा पणतूदेखील गरिबी हटावचाच नारा देत आहे, पण आजवर जनतेची गरिबी हटली नाही, मात्र काँग्रेसच्या चेल्याचपाटय़ांची गरिबी हटली, असा टोला त्यांनी लगावला.

हे कोण बोलले बोला…

pm-modi

  • कुठे? : सोलापूर
  • दिनांक      : 18 एप्रिल 2019

काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची प्रवृत्ती मागासवर्गीयांना कमी लेखण्याची आहे. मी मागासवर्गीय असल्यानेच काँग्रेस मला टार्गेट करत आहे.

  • कुठे? : जालना
  • दिनांक      : 19 एप्रिल 2019prakash-ambedkar

मोदींना फक्त निवडणुकीच्या वेळी आपली जात आठवते पण त्यांच्या सत्ताकाळातच मागासवर्गीयांवर अन्याय झाले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणेही बंद झाले आहे.

raju-shetty-1

  • कुठे? : कोल्हापूर        
  • दिनांक      : 5 एप्रिल 2019

सीमेवर आमची पोरं जातात,  देशपांडे, कुलकर्णी यांची पोरं सीमेवर लढाईला जात नाहीत, मात्र ते इतरांना देशभक्ती शिकवतात.