अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। भोकरदान

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवार, 20 रोजी काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित भोकरदन येथील जाहीर सभेत केली.

दरम्यान, भोकरदन येथे लोकसभेचे जालना मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार विलास केशवराव औताडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक सुरू होताच अब्दुल सत्तार यांनी स्वतः काँग्रेस पक्षातील घेतलेल्या विविध आणि विरोधी भूमिकांमुळे अब्दुल सत्तार यांनी पक्षासोबत केलेल्या गद्दारीची कार्यवाही म्हणून त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे सांगितले.