
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी इच्छा असलेले 1000 अनिवासी हिंदुस्थानी मायदेशी परतले असून ते भाजपचा प्रचार करणार आहेत. हे सर्व अनिवासी हिंदुस्थानी मूळचे गुजरातचे असून ते सध्या गुजरातमधील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचार करत आहेत.
हे सर्व अनिवासी हिंदुस्थानी गळ्यात फगवा स्कार्फ, सबका साथ सबका विकास असे लिहलेल्या टोप्या आणि टिशर्ट घालून गावागावात जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत. तसेच मोदींना मतदान केले की देशाची कशी प्रगती होईल हे सांगत आहेत. या सर्वांनी चाय पे चर्चासारखे कार्यक्रम देखील आयोजित केले असून मोदींच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत.
‘मोदींच्या नेतृत्त्वाखाली आम्ही देश बदलताना बघितला आहे. हाच विकास सुरूच राहावा म्हणून आम्ही लोकांना भाजपसाठी मतदान करा असे आवाहन करत आहोत’, नीरव पटेल यांनी सांगितले. नीरव पटेल हे अमेरिकेतील शिकागोमधील आयटी कंपनीत कामाला आहेत.





























































