
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण लोकलमध्ये गेल्या सहा वर्षात चैन स्नेचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोट्यवधी रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत. तरीही गुन्ह्यांमध्ये घट झालेली नाही, उलट प्रत्येक वर्षी यात वाढ झालेली आहे. गेल्या सहा वर्षात लोकल आणि परिसरात 2084 चैन स्नेचिंगच्या घटना घडल्या आहेत. चोरी गेलेल्या सौन्याच्या चैनची किंमत 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये असल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना ही माहिती लोहमार्ग पोलीस विभागाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाकडे 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईचे उपनगरीय रेल्वे हद्दीत चैन स्नेचिंगच्या किती गुन्ह्यांची नोंद झाली याबाबत माहिती मागवली होती. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 1 जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 2084 चैन स्नेचिंगच्या गुन्हे नोंद झाली असून एकूण छहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीची मालमत्ता चोरी झाली आहे. तसेच फक्त 860 गुन्ह्याची उघड झाली असून पोलिसांना फक्त 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपये इतकी किंमतीची मालमत्ता मिळाली आहेत. म्हणजे फक्त 40 टक्के किंमतीची मालमत्ता मूळ मालकास परत मिळाली आहे.
वर्षाप्रमाणे चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यांची नोंद –
2013 – 62 घटना (2037885 रुपयांचा माल चोरी), पैकी 17 गुन्हे उघ़ड झाले (693250 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2014 – 73 घटना (2367789 रुपयांचा माल चोरी), पैकी 31 गुन्हे उघड झाले (953607 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2015 – 244 घटना (8692576 रुपयांचा माल चोरी), पैकी 77 गुन्हे उघड झाले (2264043 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2016 – 309 घटना (12053333 रुपयांचा माल चोरी), पैकी 123 गुन्हे उघड झाले (3371908 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2017 – 341 घटना (14292631 रुपयांचा माल चोरी), पैकी 128 गुन्हे उघड झाले (4033259 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2018 – 214 घटना (14927222 रुपयांचा माल चोरी), पैकी 80 गुन्हे उघड झाले (3032343 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
वर्षाप्रमाणे चैन स्नेचिंग जबरी चोरी गुन्ह्यांची नोंद –
2013 – 273 घटना (10883982 रुपयांचा माल चोरी), पैकी 144 गुन्हे उघ़ड झाले (4065706 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2014 – 254 घटना (10346988 रुपयांचा माल चोरी), पैकी 133 गुन्हे उघड झाले (3772819 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2015 – 160 घटना (7219135 रुपयांचा माल चोरी), पैकी 86 गुन्हे उघड झाले (3115036 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2016 – 08 घटना (436000 रुपयांचा माल चोरी), पैकी 06 गुन्हे उघड झाले (254000 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2017 – 26 घटना (1138422 रुपयांचा माल चोरी), पैकी 22 गुन्हे उघड झाले (836548 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)
2018 – 20 घटना (1211600 रुपयांचा माल चोरी), पैकी 13 गुन्हे उघड झाले (391100 रुपयांची मालमत्ता परत मिळाली)

























































