
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या रुळांना कडक ऊन बाधल्याने सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल सेवेला शुक्रवारी दुपारी चांगलाच फटका बसला. मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ा गेले काही दिवस उशिराने धावत आहेत. त्यात शुक्रवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेची लोकल वाहतूक रेंगाळली होती. दादर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. कडक उन्हामुळे रेल्वे रूळ वाकल्यासारखे दिसल्याने गार्डने वाहतूक थांबवली. मात्र तपासणीनंतर तसे काही घडले नसल्याने पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.



























































