
सामना ऑनलाईन । ठाणे
देशाच्या राजकारणात ठाणे लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा समजला जातो. काळानुसार प्रचाराची तंत्रे बदलली, राजकारणाची दिशा बदलली तरीदेखील येथील पारंपरिक मतदार शिवसेना-भाजप युतीच्या मागे ठामपणे उभा राहिला. यावेळच्या निवडणुकीतदेखील हीच परिस्थिती कायम असून युतीच ‘ठाणेदार’ ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून युतीचे उमेदवार राजन विचारे यांचाच बोलबाला दिसून येत आहे. सर्व स्तरांमधून त्यांना भरघोस पाठिंबा मिळत असून विकासकामे, महायुतीची भक्कम एकजूट आणि शिस्तबद्ध सुरू असलेला प्रचार या जोरावर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. काँग्रेसचे शांताराम घोलप व राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा अपवाद वगळता आतापर्यंत युतीचेच उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाच्या बंधनांमुळे यावेळची निवडणूक वेगळी असली तरी मतदारांचा विश्वास शिवसेनेवरच आहे. एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत, पण मुख्य लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता थोडेच दिवस उरले असून प्रचारात विचारे यांनी मजबूत आघाडी घेतली आहे. विकासकामांचा ध्यास असलेला आणि लोकांची नस ओळखणारा हक्काचा माणूस म्हणून राजन विचारे यांची ओळख असून अनुभवाचा मोठा फायदा त्यांना यावेळच्या लोकसभा निवडणुकीत होत आहे.
ही पहा विकासकामे
- ठाणे स्थानकात दोन प्रशस्त पादचारी पूल
- आठ सरकते जिने
- ठाणे स्थानकात विकासकामांसाठी 33 कोटी खर्च
- वन रुपी क्लिनिक
- नवीन ठाणे स्थानक
- कोपरी भागात सॅटिस n ठाणे शहरांतर्गत मेट्रो
- तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण
- वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटला 1 हजार 331 कोटींची मान्यता
- घरोघरी पाइपलाइन गॅस
- मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
- मासुंदा तलावाचे सुशोभीकरण
- नवी मुंबई रेल्वे स्थानकाचा विकास
- सीवूडस् ते खारकोपर रेल्वे सुरू
- मीरा रोड आणि भाईंदर स्थानकांचा कायापालट.

























































