
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर सर्वत्र जाणवू लागली आहे. जिल्ह्यात अवघे 55 टक्के पाणी योजना सुरु आहेत तर बहुतांशी उद्भव हे कोरडे पडल्याने पाणी योजनांचे निम्मे नळ कोरडे ठाक पडले आहे.
नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील 138 पैकी 19, संगमनेरमधील 129 पैकी 44, कोपरगाव मधील 80 पैकी 04, राहता 52 पैकी 03, राहुरी 55 पैकी 01, श्रीरामपुर 82 पैकी 03, नेवासा 29 पैकी 22, शेवगांव 17 पैकी 14, पाथर्डी 98 पैकी 06, नगर 49 पैकी 26, पारनेर 29 पैकी 60, श्रीगोंदा 82 पैकी 63, कर्जत 114 पैकी 78 आणि जामखेड 63 पैकी 32 अशा योजना बंद पडल्या आहेत.
जिल्ह्यात 10419 स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहेत. सर्वात जास्त 173 संगमनेरमध्ये, पारनेर 169, अकोले 157 या तालुक्यात आहेत. या पैकी 605 योजना, उन्हाळ्यापुर्वीच बंद पडल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने काही प्रमाणामध्ये पाण्याचे टँकर तसेच पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. नळ पाणी पुरवठा योजना याचा उद्भवच कमी झाल्याने बंद पडल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. श्रीरामपुर तालुक्यातील 1, नगर 4, श्रीगोंदा 1 हे पक्त दुषित पाणीपुरवठ्यामुळे योजना बंद आहेत. वास्तविक पाहता जिल्ह्यात अत्तापर्यंत 55 टक्के पाणीयोजना सुरु आहेत. उर्वरीत पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत.
उन्हाळ्यात सर्वत्र पाणी मिळाले पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असताना दुसरीकडे पाण्यासाठी वनवन पिरण्याची पाळी नागरीकांवर आली आहे. विहिरीसुध्दा कोरड्याठाक पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजनांवर गावे आवलंबून होती. या उन्हाळ्यात धरणात काही प्रमाणात पाणी आहे. पण ते सर्वच योजनांना पुरेल असे नाही, आता पाणीपुरवठा योजना या उन्हाळ्यापुर्वीच बंद झाल्यामुळे वा पाण्याचे उद्भव अटत गेल्यामुळे अनेक गांवावर पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. याबाबीचा विचार करुन प्रशानाने विचार करुन टँकर व अन्य स्त्रोतांद्वारे पाणीपुरवठा गावाकरिता उपलब्ध करुन द्यावा अशी जोर धरु लागली आहे.























































