जैश-ए-मोहम्मदच्या तिघांना अटक,चानापोरा पोलीस चौकीवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन। श्रीनगर

श्रीनगरातील पोलीस चौकीवर शुक्रवारी झालेल्या हल्लाप्रकरणी जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या तीन दहशतवाद्यांनी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी येथे सांगितले. चानापोरा हल्लाप्रकरणी आम्ही तिघाजणांना अटक केली आहे, असे श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हसीब मुघल यांनी सांगितले.

मुश्ताक, जुनैद आणि लतीफ अशी त्यांची नावे आहेत. चानापोरी चौकीवर झालेल्या हल्ल्यात हे तिघे सहभागी होते. या हल्ल्यात एक पहारेकरी जखमी झाला होता, असे मुघल म्हणाले. हल्ल्याच्या वेळी त्यांनी सुरक्षारक्षकाची रायफल खेचून नेण्याचा प्रयत्न केला होता. हे तिघे दहशतवादी चानापोरा येथे मोटारसायकलवरून आले. मात्र, मोटारसायकल पोलीस चौकीपासून थोडी दूरवर थांबवून ते पोलीस चौकीत आले. पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा बहाणा करून जुनैद हा प्रथम पोलीस चौकीत गेला होता. त्यानंतर जुनैद हा मुश्ताक याच्यासोबत पुन्हा चौकीत शिरला. त्याने डोक्याला मुंडासे बांधले होते. मुंडासे काढण्यास सांगितल्यावर त्याने पिस्तूल काढून पहारेकऱयावर गोळीबार केला.