येत्या सहा तासात येणार चक्रीवादळ, हवामान खात्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

भारतीय हवामान खात्याने येत्या सहा तासात वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. तामीळनाडूला भेडसावत असलेलं फनी हे चक्रीवादळ रौद्र रुपात परिवर्तित होणार असून त्याचा फटका हिंदुस्थानच्या आग्नेय दिशेच्या राज्यांना बसणार आहे. या राज्यांमध्ये तामीळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

सध्या ‘फनी’ चक्रीवादळ हे बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदुस्थानी सागरात घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या हवेच्या दाबाचे रूपांतर ‘फनी’मध्ये शनिवारीच तयार झालेले आहे. पण, हे चक्रीवादळ आंध्र, तामीळनाडूपर्यंत पोहचण्याअगोदर ते परत फिरण्याचीही शक्यता आहे. तसेच हे चक्रीवादळ या किनारपट्टीला धडकेलच असे नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली होती. मात्र, हवामान खात्याने येत्या सहा तासात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.