बीड शहराला गूढ आवाजाचा हादरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

एकीकडे रविवारी मध्यरात्री कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असताना सोमवारी दुपारी 12: 50 वाजता बीड शहर गूढ आवाजाने हादरले, प्रत्येक पाच सहा महिन्यांच्या अंतराने आवाजाच्या हादऱ्याचे गूढ काही उकललेलं नाही. सोमवारी दुपारी 12 वाजून 50 मी ला बीड शहराला गूढ आवाजाचा हादरा बसला , हा हादरा 20 ते 25 की मी परिसरातील गावाना ही जाणवला नेहमीच बीड शहर गूढ आवाजाने हदरत असून या हादऱ्याचे कारण मात्र समजेना गूढ आवाजाबाबत प्रशासनांकडे ही कोणतीच माहिती उपलब्ध नाही,