पूर्णा तालुक्यात पाणीबाणी, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पूर्णा

तालुक्यात सध्या सर्व कारभार हा सरकारी बाबूच्या निष्क्रियतेमुळे ढळला आहे भीषण पाणीटंचाई असताना ग्रामीण भागातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटवंâती करत आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आणि गावच्या सरपंचांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव पंचायत समिती व तहसील कार्यालयात दाखल केले असता त्यांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. ग्रामीण भागामधील पाण्यासाठी आणीबाणी असतानाही पूर्णा पं.स. अंतर्गत असलेले ग्रामसेवक सर्व कर्मचारी गावांकडे फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत असून कर्तव्यदक्ष जिल्हाधिकार्‍यांनी पूर्णा तालुक्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमध्ये होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना शेतामध्ये चारा नाही. अशी भीषण परिस्थिती पूर्णा तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. तालुक्यातील प्रशासन मात्र तहसीलदार गटविकास अधिकार्‍यांनी या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पंचायत समिती व तहसील कार्यालयात शुकशुकाट होता.  मागील ५ वर्षांपासून सततचा दुष्काळ पडून पाण्याचे प्रमाण कमी होत असून पिण्यासाठी पाणी नाही. अशी भयावह परिस्थिती पूर्णा तालुक्यातील कावलगाव, चुडावा, वझुर, ताडकळस, सुहागन, बरबडी, धोत्रा, रेगाव, धोत्रा, खरबडा आदींसह ५० गावांमध्ये सध्या जाणवू लागली आहे. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर प्रशासनाने पाणीप्रश्नांकडे लक्ष देण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर असताना पूर्णा पंचायत समिती अंतर्गत  सर्वच कर्मचारी गायब दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांना रात्रंदिवस एक करून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अनेक गावातील हातपंप नादुरुस्त आहेत. हातपंप दुरुस्तीची गाडीही केवळ पदाधिकार्‍यांच्या गावांमध्ये फिरत आहे. तर अनेक गावच्या योजना या अर्धवट अवस्थेत आहेत. ग्रामीण भागामध्ये राहणारी जनता ही केवळ ग्रामपंचायत मध्ये जाऊनच आपले प्रश्न मार्गी लावू शकते. परंतु आणि कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये येत नसल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवडाभरापासून पाहावयास मिळत आहे.

पूर्णा तालुक्यातील अनेक भागात पूर्णा गोदावरी नदीचे पाणी पिण्यासाठी मिळत होते. परंतु या दोन्ही नद्यांच्या पात्रांमध्ये सध्या पाणी आयोजित वाळूमाफिया सक्रिय झाल्याने पाण्याचे पात्र पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. पूर्णा तालुका हा दुष्काळजन्य तालुका बनला आहे. तालुक्यातील दुष्काळ समाजल्यानंतर या दुष्काळी सर्कलमध्ये शासनाने अद्यापही कोणत्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जावे कुणाकडे? असा सवाल निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने तलाठी ग्रामसेवकांना प्रत्यक्ष जवळ जाण्याचे आदेश दिले आहेत. त्या-त्या गावात जाऊन सर्व परिस्थितीची जाण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पूर्णा येथील तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे तलाठी सुद्धा दुष्काळ पाहण्यासाठी बाहेर पडताना नाहीत, अशी अवस्था सध्या तालुक्यात निर्माण झाली आहे.