
सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जनतादुष्काळाने होरपळत असतांना प्रशासन हातावर हात मारून बसले आहे. तीव्र पाणी टंचाईने जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणातून तात्काळ डाव्या कालव्यात पाणी सोडून जनतेला दिलासा देण्यात यावा अशी मागणी शिवसेने केली आहे. तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे मंजुरी अभावी पडून असलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, खरीप विम्याची रक्कमेचे सर्व बँकांना तात्काळ वाटप करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, फळपीक विमा भरूनही १५०० फळबाग उत्पादक हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना लाभ देण्यात यावा. अशा विविध मागण्याही निवेदनात करण्यात आल्या. आहेत. वरील मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी नसता शिवसेना रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल असा इशारा घनसावंगी तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख उद्धव मरकड, जि.प.सदस्य अंशीराम कंटूले, बापूराव देशमुख, रमेश बोबडे,संभाजी उढाण, पुरुषोत्तम उढाण, जयंत बागल, रामनाथ पवार, बबन घोगरे, गणेश काळे, मधुकर साळवे, पंढरीनाथ साबळे, तुकाराम कोल्हे, महादेव उढाण, दिगंबरउगले, विश्वबर ढेरे, गणेश आर्दड, गोरख पांढरे, अहेमद चांद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

























































