10 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षिकेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

ल्युओसीनातील लेक चार्ल्स चार्टर अॅकॅडेमीच्या तक्रारीवरून पोलिसांनी डायडर आर. स्मिथ (34) या शिक्षिकेला 10 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. कॅलोसिओ परिश शेरीफच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात शिक्षिका दोषी असल्याचा तसेच तिने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची माहिती प्राथिमक तपासात उघड झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. या शिक्षिकेचे त्या विद्यार्थ्यांशी गेल्या वर्षीपासून संबंध होते. ती त्याच्यावर संबंध ठेवण्यासाठी दडपण आणत होती. विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. 50 हजार डॉलरच्या जातमुचलक्यावर तिला जामीन देण्यात आला आहे.

स्मिथ यांच्या विद्यार्थ्यांपैकी एका 10 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध असल्याची तक्रार कॅलोसिओ परिश शेऱीफच्या अधिकाऱ्यांकडे लेक चार्ल्स चार्टर अॅकॅडेमीच्या प्रशासनाने 30 एप्रिलला दाखल केली होती. अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात शिक्षिकेचे 10 वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत गेल्या वर्षीपासून अनैतिक संबंध असल्याचे आढळले. तिने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच त्याच्यावर बलात्कार केल्याचे तपासात आढळले आहे. त्या विद्यार्थ्याला अपमानित करून शारीरिक छळ आणि त्याच्यावर दडपण आणल्याचे तपासात आढळले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत 10 वर्षांच्या विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांचे शिक्षेकेकडून लैंगिक शोषण झाले नसल्याचे अॅकॅडेमीने स्पष्ट केले आहे. शाळेच्या परिसरातच ही अत्याचाराची घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या शिक्षिकेला 50 हजार डॉलरच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.