
सामना ऑनलाईन । कोलंबो
श्रीलंकेत ईस्टर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 600 विदेशी नागरिकांसह 200 मौलानांना देशाबाहेर हाकलले आहे. गृहमंत्री वाजिरा अभयवर्धने यांनी ही माहिती दिली असून अनेक मौलाना देशात बेकायदेशीरित्या देशात आले होते. हल्ल्यानंतर त्यांच्या विजाची तारीख उलटली होती तरी ते देशात स्थायिक होते. त्यांच्यावर त्यांना दंड आकारून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अभवर्धने यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या सुरक्षेसाठी वीजा प्रणालीचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर धार्मिक शिक्षण देणार्या शिक्षकांसाठी विजाचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच जेवढे लोक देशाबाहेर निष्कासित केले आहे त्यापैकी 200 हे मौलाना होते.
21 एप्रिल रोजी श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात 257 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जखमी झाले होते. यात काही मौलानांचाही हात होता.


























































