
सामना प्रतिनिधी, मुंबई
दुष्काळासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही मदत अपुरी असून ही मदत वाढविण्यात यावी. त्याचप्रमाणे या तीक्र दुष्काळाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांतील चारा छाकण्या बऱयाच उशिराने स्थापन झाल्या असून त्या पुरेशा नाहीत.
आठवड्याला तीन किलो इतकी अपुरी पेंड एका जनावरामागे दिली जाते. तीही अपुरी आहे. मोठ्या जनावराला 90 आणि लहान जनावराला त्यापेक्षा कमी असं अपुरं अनुदान मिळतंय. पाण्याचा टँकर, वीजेची बिलं, शेड उभारणे असे खर्चही आहेत. दुष्काळी भागातील विद्यार्थी पावसाळ्यात नव्याने महाविद्यालयात प्रवेश घ्यायला जातील तेक्हा कदाचित त्यांची फी भरण्याची ऐपत नसेल. त्यांची फी माफ करावी किंवा फी भरण्याची प्रक्रिया शासनामार्फत केली जावी, अशी मागणी करण्यात आली.



























































