
सामना ऑनलाईन। कोलकाता
lok sabha election 2019 पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. बॅरकपूरमध्ये भाजप उमेदवार अर्जुन सिंह यांनी टीमएसीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर भाजपच गुंडगिरी करत असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.
मोहनपूर भागातील मतदान केंद्रात टीमसीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला खेचत बाहेर काढले. यात मी जखमी झालो असून टीमसी कार्यकर्त्यांनी मतदारांनाही धमकावले असल्याचा आरोप अर्जुन सिंह यांनी केला आहे. तसेच जेव्हा ही घटना घडली तेव्हा ड्यूटीवर असलेले केंद्रीय दलाचे जवान मद्यधुंद अवस्थेत होते असेही सिंह यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे तृणमूल कार्यकर्त्यांनी भाजपवर गुंडगिरीचा आरोप केला आहे. मतदान शांततेत सुरू असतानाच भाजपचे उमेदवार तिथे आले व त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामुळे मतदान थांबवावे लागले, असे टीएमसी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या गोंधळनाट्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना तिथून हटवले आहे.
West Bengal: Arjun Singh, BJP candidate from Barrackpore alleges that he was attacked by TMC workers, says,”I was attacked by TMC goons who have been brought from outside. Those people were scaring away our voters. I am injured.” pic.twitter.com/lWXY3mbbZZ
— ANI (@ANI) May 6, 2019


























































