आमदार राजा सिंह यांची सुटका, मशिदीच्या बांधकामास विरोध केल्याने झाली होती अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामाला विरोध केल्याने अटक केलेले आमदार राजा सिंह यांची सोमवारी पहाटे सुटका करण्यात आली आहे. राजा सिंह यांच्या अटकेनंतर पोलीस स्थानकाबाहेर भाजप आणि हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

हैदराबाद येथील अंबरपेट भागात सुरू असलेल्या मशिदीच्या बेकायदेशिर बांधकामाला विरोध केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सोमवारी पहाटे त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजा सिंह म्हणाले की, रझाकार सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी अशी कारवाई केली. या दरम्यान राजसिंग यांनी एमआयएम व टीआरएस सरकारवर निशाण साधला आहे. तसेच शहरात होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामाला आमचा विरोध कायम राहील असेही ते म्हणाले.