सापाने दंश केल्याने चिडलेल्या आजोबांनी घेतला सापाचा चावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील अजनवा गावात एक विचित्र घटना घडली आहे. येथे शेतात काम करत असतान एका सत्तर वर्षीय आजोबांना सापाने दंश केला. याचा राग आल्याने चिडलेल्या आजोबांनी त्या सापाचाच चावा घेतला. पण लोकांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. त्यानंतर आजोबा बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पर्वत गाला बरिया (70) असे त्यांचे नाव आहे.

महिसागर जिल्हयातील अजनवा गावात राहणारे पर्वत बरिया शेतात काम करत होते. त्याचवेळी शेतातील एका विषारी सापाने त्यांच्या पायाला दंश केला. हे बघताच पर्वत चिडले. त्यांनी धावत जाऊन त्या सापाला पकडलं आणि त्याचा चावा घेतला. त्यानंतर त्यांनी चक्क सापाला खाण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना रोखले. त्यानंतर बरिया बेशु्द्ध झाले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. सर्पदंशामुळे त्यांच्या शरीरात विष पसरले होते. त्यातच त्यांनी सापाचा चावा घेतल्याने त्याचे विषही बरिया यांच्या शरीरात भिनले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.