लेख: व्यक्तिगत जेनेटिक तपासणी आणि हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अमोल नायकवडी

तुमच्या डीएनएतील फरक शोधून काढण्याची पद्धत म्हणजे जेनेटिक तपासणी होय. सर्वसाधारण जेनेटिक तपासणीत डीएनएतील फरक शोधून त्यातून एखाद्या विशिष्ट घटकापासून तुम्हाला वैयक्तिकपणे उद्भवणारा धोका सांगितला जातो. डीएनएच्या धोकादायक फरकांचे असे विश्लेषण केल्याने अनेकविध परिमाणांपासून एखाद्या व्यक्तीला असलेला जेनेटिक धोका / कल यांचा रिपोर्ट देता येतो. यातून तुमची जीवनशैली तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार बदलण्यात तसेच देखरेख ठेवण्यासाठी नियमितपणे तपासण्या करून घेण्यात मदत होते. या प्रकारच्या डीएनएवर आधारित जीवनशैलीमुळे जेनेटिक धोके कमी करता येतात तसेच एनसीडीजचा प्रादुर्भाव रोखता येतो. 

जेनेटिक तपासणीतून आपल्याला जीन्सविषयीचे ज्ञान तर मिळतेच, पण आपल्या शरीरप्रकाराचे विश्लेषण व जुळणी करून घेण्याची क्षमता प्राप्त होते आणि त्यामुळे योग्य ते आरोग्य सल्ले मिळण्यासाठी मदत होते.आजच्या घडीला तंत्रज्ञान आपल्याला सर्व काही सांगण्यास सक्षम आहे, अगदी कुठला गंभीर आजार आपल्याला भारी पडेल इथपासून ते आपण केलेल्या डीएनए तपासणीवर आधारित व्यक्तिगत आहार आणि तंदुरुस्तीचे नियोजन इथपर्यंत सर्व काही.

संशोधन असे सांगते की, वर्तवली जाणारी (प्रॉग्नॉस्टिक) जेनेटिक तपासणी आणि ग्राहक किंवा वेलनेस जीनॉमिक्सचे सन 2015 मधील बाजारमूल्य 2.24 अब्जापर्यंत होते आणि सन 2025 पर्यंत त्याचे मूल्य दुपटीने वाढेल. म्हणजे 4.6 अब्जापर्यंत जाईल.

हिंदुस्थानातील अनेक बाजारपेठांच्या विपरीत सर्वजण उपचारांच्या हेतूने जेनेटिक तपासणी करून घेतात, पण रोगांना प्रतिबंध करण्यासाठी ही चाचणी कधीच केली जात नाही, पण याच्या उलट प्रतिबंधात्मक उपायांची गरज हिंदुस्थानसाठी उच्चतम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सन 2016च्या अहवालातील अंदाजानुसार असंसर्गजन्य रोगांमुळे (नॉनकम्युनिकेबल डिसीज ऊर्फ एनसीडी) रोगांमुळे हिंदुस्थानात साधारण 60 लाख मृत्यू होतात. म्हणजे एकूण मृत्यूंपैकी 63 टक्के प्रमाण. एनसीडीचा आरंभ आणि वाढ होण्याचा धोका अनेक घटकांमुळे वाढू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर जेनेटिक्स, जीवनशैली किंवा स्वभाव व वागण्याची तर्‍हा, वातावरणीय घटक, वय, शरीरविज्ञान, चयापचय इत्यादी. याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की, जेनेटिक्स हा धोकादायक घटकांमधील बदलता न येण्याजोगा मुख्य घटक आहे. एखाद्या व्यक्तीचे आरोग्य हे जेनेटिक्स आणि काही इतर घटकांवर अवलंबून असते. दुसरीकडे त्याच वेळेला, ज्यात बदल घडवून आणता येतील असे धोकादायक घटक म्हणजे जीवनशैली किंवा स्वभाव. याच घटकांतील विशेषकरून आहार आणि खाण्याच्या सवयी तसेच शारीरिक तंदुरुस्तीच्या पातळ्या एनसीडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात मदत करतात.

रोचक गोष्ट अशी की, बदल घडवता येण्याजोग्या आणि बदल घडवता न येण्याजोग्या धोकादायक घटकांमध्ये म्हणजे जीवनशैली आणि जेनेटिक्स या दोन घटकांमध्ये आरोग्याच्या अनेक शक्यता सामावलेल्या असतात. एखादा जेनेटिक धोका आणि आपण जगत असलेली प्रतिकूल जीवनशैली हे दोन घटक मिळून एखाद्या व्यक्तीला एनसीडी होण्याचा एकूण धोका वाढवू शकतात. याच्याच विरुद्ध एखादी अनुकूल जीवनशैली एनसीडी होण्याचा जेनेटिक धोका कमी करू शकते. उदाहरणार्थ, ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार प्रतिकूल जीवनशैलीऐवजी अनुकूल जीवनशैली अवलंबली तर अशा व्यक्तीला करोनरी धमन्यांचा आजार व्हायची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते. तशाच प्रकारे भाज्या आणि फळांचे सेवन केल्याने तोंड, फॅरिंक्स, युसोफॅगस, फुप्फुसे, आतडी आणि गुदद्वाराच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असे दिसून आले. संशोधनातून अशाच प्रकारच्या इतर एनसीडीजपासून असलेला धोका कमी झाल्याचे आढळून आले आहे. उदाहरणार्थ स्थूलता, टाईप 2 मधुमेह इत्यादी. कळीचा मुद्दा हा आहे की, आपण व्यक्तीला असलेली जेनेटिक जोखीम निश्चितपणे सांगू शकतो का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. जेनेटिक तपासणी केल्याने आता जेनेटिक धोका अथवा व्यक्तीच्या शरीराचा एखाद्या आजाराकडे असलेला कल शोधून काढता येतो.

तुमच्या डीएनएतील फरक शोधून काढण्याची पद्धत म्हणजे जेनेटिक तपासणी होय. सर्वसाधारण जेनेटिक तपासणीत डीएनएतील फरक शोधून त्यातून एखाद्या विशिष्ट घटकापासून तुम्हाला वैयक्तिकपणे उद्भवणारा धोका सांगितला जातो. उदाहरणार्थ, स्तनांच्या कर्करोगावरील व्यक्तिगत जेनेटिक तपासणीत या रोगाशी संबंधित असलेल्या बीआरसीए 1,बीआरसीए 2 आणि इतर जीन्सच्या धोकादायक घटकांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती शोधून काढण्याचा समावेश असतो. तसेच इतर एनसीडीजशी आणि इतर गुणधर्माशी निगडित असलेले असे अनेक धोकादायक घटक शोधून काढले गेले आहेत. उदाहरणार्थः पोषक आहार, तंदुरुस्ती, औषधांविषयी असलेली शारीरिक संवेदनशीलता, सौंदर्य इत्यादी. डीएनएच्या धोकादायक फरकांचे असे विश्लेषण केल्याने अनेकविध परिमाणांपासून एखाद्या व्यक्तीला असलेला जेनेटिक धोका / कल यांचा रिपोर्ट देता येतो. यातून तुमची जीवनशैली तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार बदलण्यात तसेच देखरेख ठेवण्यासाठी नियमितपणे तपासण्या करून घेण्यात मदत होते. या प्रकारच्या डीएनएवर आधारित जीवनशैलीमुळे जेनेटिक धोके कमी करता येतात तसेच एनसीडीजचा प्रादुर्भाव रोखता येतो. अशा तर्‍हेने एनसीडीजचे लवकर निदान होण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी जेनेटिक जोखमी ओळखून त्यानुसार जीवनशैलीत बदल घडवणे आणि नियमित तपासणी करणे ही एक महत्त्वाची आरोग्य व्यूहरचना ठरते.

म्हणून एनसीडीजचे वाढते दडपण असलेला हिंदुस्थान ही एक शोध न घेतलेली अजस्र बाजारपेठ आहे. याव्यतिरिक्त लोकांची रोगाला प्रतिबंध करण्याची मानसिकता यावी म्हणून त्यांना जेनेटिक तपासणीच्या अत्यावश्यक भूमिकेविषयी जागरूक करणे गरजेचे आहे.

genetic-article

(लेखक इंडस हेल्थ प्लसचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तज्ञ आहेत. )