भाट्ये समुद्रकिनारी तरूण जळालेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी 

रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये समुद्रकिनारी एक तरूण जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या तरुणाबाबतची कोणतीही माहिती मिळालेली नाही. तो सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर याबाबत अधिक माहिती मिळणार आहे. मात्र, तो कसा जळाला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या कपारीत तो जळालेल्या स्थितीत होता. या कपारीत तो कसा आला असा सवालही निर्माण झाला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.