
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत दोन टप्प्यासाठी मतदान बाकी आहे. या शेवटच्या टप्प्यांमध्ये अचानक माजे पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव प्रचारात घेतले जात आहे. आता या वादात केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही उडी घेतली आहे. राजीव गांधींच्या हत्येसाठी काँग्रेस द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला दोषी ठरवत होते आता त्यांच्याशीच मैत्री केल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.
जेटली यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “1991ते 2004 या काळात काँग्रेसने राजीव गांधींच्या हत्येसाठी द्रमुक पक्षाला दोषी मानले होते. याच कारणास्तव त्यांनी आघाडीचा पाठिंबाही काढला होता.” आता राजीव गांधींच्या हत्येला भाजप जबाबदार असल्याची उपरती काँग्रेसला झाल्याची टीका जेटली यांनी केली आहे.
From May 1991 till 2004, the Congress blamed its present ally the DMK for Shri Rajiv Gandhi’s assassination. It even withdrew support from the United Front government on this ground. 28 years later, today a desperate Congress has discovered a BJP role.
— Chowkidar Arun Jaitley (@arunjaitley) May 9, 2019
काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी राजीव गांधींच्या हत्येला भाजपला दोषी ठरवले होते. पटेल म्हणाले होते की, “ज्यावेळी राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा व्ही.पी सिंग यांचे सरकार होते. या सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा होता.” या सरकारने राजीव गांधींना अधिक सुरक्षा देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या झाल्याचे पटेल यांनी सांगितले.
Abusing a martyred Prime Minster is the sign of ultimate cowardice
But who is responsible for his assassination ?
The BJP backed VP Singh govt refused to provide him with additional security & left him with one PSO despite credible intelligence inputs and repeated requests
— Ahmed Patel (@ahmedpatel) May 9, 2019




























































