रेल्वे मार्गावरून मशिन घसरले, कोकण रेल्वे ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ratnagiri-railway-station

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याने कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. युटिव्ही असं मशिनचं नाव असून हे मशिन घसरल्याने मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना ब्रेक लागला. रत्नागिरी जवळच्या भोके गावाजवळची घटना घडली असून तासाभरापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे.