
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विरोधी पक्षाला माहित आहे की ते या निवडणुकीत हरणार आहेत, म्हणून मला शिव्या घालून ते आपला राग व्यक्त करत असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. बिहारच्या बक्सरमध्ये एका सभेत ते बोलत होते. विरोधी पक्ष कमकुवत आणि खिचडी सकार बनवण्याची त्यांची योजना होती. कमकुवत सरकार आले तर लोकांचे पैसे लुटण्यास त्यांना संधी मिळाली असती असेही मोदी म्हणाले.
चुनाव के 6 चरणों के बाद महामिलावटी बौखला गए हैं। यह बौखलाहट साक्षात दिख रही है।
उनकी हार जैसे-जैसे और तय होती जा रही है, गालियां वैसे-वैसे और बढ़ती जा रही हैं। pic.twitter.com/5cUc0A60gf
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) May 14, 2019
विरोधकांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, “आज गरीब जनता मोदी मोदी करतात. तेव्हा विरोधकांचा पारा वर चढतो. काँग्रेस असो वा राजद. यांच्या विचारातच खोत आहे. ते 21शतकाच्या हिंदुस्थानला नाही समजू शकत. त्यांना बिहार आणि देशाला अंधारातच ठेवायचे आहे.”
राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले की, ‘‘हिंदुस्थानचे तुकडे तुकडे व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे व तसेच जे दगडफेक करतात त्यांना विरोधक खुला परवाना देण्याची त्यांना इछा आहे. विरोधक देशाची अखंडता मिटवण्यासाथी प्रयत्न करत असून त्यांना अडवणं हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच मतदारांचा उत्साह आणि समर्थन पाहून सहाव्या टप्प्यांनंतर विरोधकांची अवस्था वाईट झाल्याचे मोदींनी म्हटले.






















































