एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी, अकराशे अंकानी उसळला सेन्सेक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित एनडीला बहुमत मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकदारांमध्ये उत्साह दिसून आला. बीएसई चा सेन्केस 1100 अंकानी तर निफ्टी 244.75 अंकांनी उसळला आहे. सेन्सेक्स 38 हजार 701 वर उघडला होता तो काहे काही क्षणात 38 हजार 995 वर गेला होता.

निफ्टीच्या अंकातही 244..75 अंकांनी वाढल्याने 11 हजार 651 ने उघडला होता. रविवारी सांयकाळी वेगवेगळ्या एक्झिट पोलने एनडीएला 300 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. 23  तारखेला निकाल हाती येणार आहे.  निकालापर्यंत शेअर बाजारात काय होईल याबाबत तज्ज्ञांनी अनिश्चितता राहील असा अंदाज व्यक्त केला होती.