
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणाअरे सपाचे नेते आझम खान यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एक्झिट पोलवर बोलताना आझम खान म्हणाले की, “कुठलीतरी विदेशी ताकत हल्ला करणार, निकालापुर्वीच भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.” तसेच आता लोकशाही संपणार असेही खान म्हणाले.
एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना आझम खान म्हणाले की, “हे देशाचे मोठे दुर्भाग्य आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशात भितीदायक वातावरण आहे. हे देशासाठी चांगले आहे. येणार्या सरकारशी लोक घाबरून असतील. लोकशाही संपली. दहशततंत्र सुरू होऊन लोक घाबरतील. विदेशीत ताकत हल्ला करतील असे वाटत आहे.”
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवण्यास सुरूवात केली. यात एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणितला बहुमत मिळताना दिसत आहे.





























































