१० लाखासाठी विवाहितेचा छळ करून घरातून हाकलून दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

माहेरवरुन १० लाख रुपये, सोफासेट, फ्रिज, मोटारसायकल घेऊन यावे म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. तिला घरातून हाकलून लावण्यात आले. या प्रकरणी चारजणांविरुध्द देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फातेमाबी शादूल उर्फ शहारुख शेख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीचे लग्न ५ मे २०१७ मध्ये शादूल उर्फ शहारुख शेख याच्याशी अवलकोंडा येथे झाले. लग्नामध्ये २ लाख ४१ हजार रुपये हुंडा, ३ तोळे सोने, संसारोपयोगी वस्तू देण्यात आलेल्या होत्या. लग्नानंतर केवळ २ महिने सासरच्या लोकांनी चांगले नांदवले. माहेरवरुन १० लाख रुपये घेऊन ये, सोफासेट, फ्रिज, मोटारसायकल घेऊन ये म्हणून छळ केला. अश्लिल शिवीगाळ करून, लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि घरातून हाकलून लावले.

या प्रकरणी फिर्यादीचा नवरा शादुल उर्फ शाहरुख इलाही शेख, सासरा इलाही अब्दुलसाब शेख, सासू हिना उर्फ अफसरबी इलाही शेख, नणंद आसमाबी पिता इलाही शेख सर्व रा. अवलकोंडा ता. उदगीर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.